Tuesday, May 12, 2009

मराठी लिखाण

आता मराठी लिखाण इंटरनेटवर भरपूर झालऽ आहे.
मी सहजच google search वर टाकलऽ ’कोण आहे रे तिकडे’ तर अक्षरशः ४३,८०० पानऽ सापडले.
काही मोजकी पानऽ वाचली, छान वाटलऽ वाचून की आता मराठीत खरोखर भरपूर लिखाण व्हायला लागले आहे.
मी आतापर्यंत जे काही थोडेफार मराठी blogs नेहमी वाचत असतो, तेथे जिथे जिथे व्याकरण किंवा लिपीदृष्ट्या दुरुस्ती सुचवाविशी वाटली, तिथे मी तशी कळवली. माझ्यामते, आपण सगळ्यांनीच असा प्रयत्न यथाशक्ती करत रहावा. यामुळे, अधिकाधीक मराठी चांगल्या स्वरूपात मांडता येईल.

याचे अनेक फायदे होतील. मुख्य म्हणजे, google वगैरे स्थळांवर हवे ते मराठी पान शोधणे सोपे जाईल. सर्व मंडळींना, एकमेकांना शोधणे व संवाद साधणे सोपे जाईल. संपूर्ण नेटवर एकसंधपणा वाढेल. पुढच्या सगळ्या पिढ्यांना तर याचा सर्वाधीक फायदा होईल.

यासाठी एखादे मित्रमंडळ असेल तर खुप लवकर एकमेकांस मदत करण्यास फायदा होईल. असा विचार करून मी त्यादृष्टीने प्रयत्न करतो आहे. ज्यांना ज्यांना यात योगदान द्यायचे असेल, त्यांनी कृपया आपले अभिप्राय कळवावे.

तसेच सुरवातीसाठी सदर पानावर माहिती पहा व मित्रमंडळात सामील व्हा: http://www.orkut.co.in/Main#Community.aspx?cmm=90016191

2 comments:

  1. खरोखर आपले विचार पटणारे आहेत. पण नेहमीच्या मराठी वापरात आपण खूप चुका पहातो त्याना कोण सुधारणार ? तरीही आपण हा उपक्रम चालू ठेवूया !

    शुभेच्छा !

    ReplyDelete
  2. विरेन्द्र,

    आपण म्हणता ते खरं आहे. चुका खुपच आहेत. पण त्याला काही अशी कारणंही आहेत जी अगदी कमी वेळात टाळता येण्याजोगी आहेत.

    जसे नूतनजींनी म्हटले आहे येथे: http://www.orkut.co.in/Main#CommMsgs.aspx?cmm=90016191&tid=5337676323429277727


    बरेचदा ‘नवीन’ इ - लेखक र्‍हस्व - दीर्घाच्या चुकाही खूप करतात. किंवा कधी कधी एखादा शब्द कसा लिहायचा माहीत असूनही, कीबोर्डवर योग्य कीज्‌ शोधायच्या कंटाळ्यापायी जसा उमटला तसाच ठेऊन देतात. नवीन, शांती, षट्‌कार इ.

    सगळेच लेखन न सांगता व्यवस्थित होईल अशातला भाग नाही.

    जसे प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांना proof reading ची गरज असते, तसेच ब्लॉग वगैरे लेखनालाही त्याची गरज असते. यात थोडा वेळ तर लागणारच. जेवढी आपण एकमेकांची मदत करू शकू तेवढा लिखाणाचा दर्जा सुधारेल.



    एकदा लोकांना नविन गोष्टी कळल्या की आपोआप नविन लिखाण चांगले होईल आणि इतरांनाही नीट लिहिण्याची प्रेरणा मिळेल. सगळ्याच वाचकांना चांगल्या वाचनाचा आनंद मिळेल.

    ReplyDelete

मला आपला अभिप्राय जाणून घेण्याची खुप उत्सुकता आहे. जरूर लिहा.