Tuesday, May 12, 2009

मराठी लिखाण

आता मराठी लिखाण इंटरनेटवर भरपूर झालऽ आहे.
मी सहजच google search वर टाकलऽ ’कोण आहे रे तिकडे’ तर अक्षरशः ४३,८०० पानऽ सापडले.
काही मोजकी पानऽ वाचली, छान वाटलऽ वाचून की आता मराठीत खरोखर भरपूर लिखाण व्हायला लागले आहे.
मी आतापर्यंत जे काही थोडेफार मराठी blogs नेहमी वाचत असतो, तेथे जिथे जिथे व्याकरण किंवा लिपीदृष्ट्या दुरुस्ती सुचवाविशी वाटली, तिथे मी तशी कळवली. माझ्यामते, आपण सगळ्यांनीच असा प्रयत्न यथाशक्ती करत रहावा. यामुळे, अधिकाधीक मराठी चांगल्या स्वरूपात मांडता येईल.

याचे अनेक फायदे होतील. मुख्य म्हणजे, google वगैरे स्थळांवर हवे ते मराठी पान शोधणे सोपे जाईल. सर्व मंडळींना, एकमेकांना शोधणे व संवाद साधणे सोपे जाईल. संपूर्ण नेटवर एकसंधपणा वाढेल. पुढच्या सगळ्या पिढ्यांना तर याचा सर्वाधीक फायदा होईल.

यासाठी एखादे मित्रमंडळ असेल तर खुप लवकर एकमेकांस मदत करण्यास फायदा होईल. असा विचार करून मी त्यादृष्टीने प्रयत्न करतो आहे. ज्यांना ज्यांना यात योगदान द्यायचे असेल, त्यांनी कृपया आपले अभिप्राय कळवावे.

तसेच सुरवातीसाठी सदर पानावर माहिती पहा व मित्रमंडळात सामील व्हा: http://www.orkut.co.in/Main#Community.aspx?cmm=90016191