मित्रहो,
चला आता आपण सगळे जण मिळून सगळ्याप्रकारची माहिती देणारी संकेतस्थळे एकमेकांना कळवूया.
मला सध्या फक्त एक video सापडला आहे YouTube वर ज्यामधे Baraha IME प्रस्थापित (हा हा हा, म्हणजे आपलं install हो) करण्याची पद्धत दिली आहे.
दृक्श्राव्य माध्यम याबाबतीत अधिक उपयोगी असल्यामुळे, कोणाकडे video असतील, तर जरूर जरूर कळवा. कारण आपल्या target audience मधले बरेचसे लोक आळशीपणामुळे चुका करत असतात. मग वाचन करण्याचा कंटाळा असणार्यांना video मुळे लगेच व व्यवस्थित माहिती पाहता येईल (कमी श्रमात!).
आता मला जो video सापडला त्याबद्दल:
यात दाखवलं आहे की Baraha IME हे install करण्यास किती सोपं आहे. गंमत म्हणजे त्यात वापरलेल्या computer वरचा भयानक wallpaper.
मला एक महत्वाची सुचना फार आवडली : ती म्हणजे install झाल्यावर लगेच बरहाची भाषा बदलून मराठी करणे..... मला माझा Baraha 6.0 वापरतानाचा पहिला अनुभव आठवला. सरळ मी बटणं दाबायला सुरवात केली तर समोर चक्क कन्नड ! मग मराठी करण्यासाठी कुठे काय setting आहे यासाठी शोध.
वाचक लोकहो, जर आपण काही माहिती पुरवू शकत असाल तर जरूर जरूर प्रतिक्रियेतून कळवा.